loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड-म्हाप्रळ-मुंबई मार्गावर दापोली फाटा येथे गुरांचा ठिय्या

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड-धूत्रोली-शेनाळे-म्हाप्रळ-मुंबई हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आहे. असा हा लोणंद राजावाडी ते आंबडवे दरम्यानचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून नव्याने तयार झाला आहे. हा रस्ता सिमेंट कॉक्रिटीकरण झालेला असल्याने आणि प्रशस्त असा असल्याने या मार्गावर वाहने सुसाट वेगाने धावत असतात अशा या मार्गावर दापोली फाटा येथे आज गुरांनी रास्ता रोको केल्याने रस्त्यावरुन गुरे बाजुला हटेपर्यंत काही वेळ वाहनांना पुढे मार्गस्थ होता आले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड तालुक्यातील मंडणगड ते म्हाप्रल दरम्यानचा रस्ता हा मंडणगड तालुक्यातील बाणकोट, वेळास, देव्हारे, पालवणी, मंडणगड शहर, भिंगळोली तसेच दापोली तालुक्यातील अनेक गावांना मुंबई, पुणे, ठाणे आदी महत्त्वाच्या आणि मोठ्या शहरांकडे जाण्यासाठीचा महत्वाचा असा मार्ग आहे. अशा या मार्गावर सध्या गणेशोत्सवासाठी आपल्या गावी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे.

टाईम्स स्पेशल

अशा या वाहतुकिच्यादृष्टीने महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावर मंडणगड तालुक्यातील भिंगळोली हद्दीत दापोली फाटा येथे सध्या नेहमीच गुरे ठाण मांडून बसू लागली आहेत. तसेच रस्त्याच्या मधोमध उभी राहून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे अपघातास आमंत्रण मिळत आहे. संबंधित गुरांच्या मालकांनी आपली गुरे दाव्यावर बांधून ठेवावीत किंवा गुरांच्या मागे राहून कोणालाही आपल्या गुरांचा तसेच वाहतुकीला अडथळा वा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg