loader
Breaking News
Breaking News
Foto

ओटव फाटा येथे कार दुभाजकाला धडकली; एकाचा मृत्यू तर चार जखमी

कणकवली (प्रतिनिधी) - गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून मोठ्या संख्येने गणेशभक्त सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगावनजीक ओटव फाटा येथे आज रविवारी सकाळी ७ च्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. मुंबई-बदलापूर येथून मालवण तालुक्यातील आचरा-आडवली येथे जाणारी कार आज रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास नांदगाव ओटव फाटा येथे आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटून कार दुभाजकाला धडकली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात आनंद दादू लाड (वय अंदाजे ७०, रा. नालासोपारा, मुंबई) यांचा मृत्यू झाला असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. कारमध्ये एकूण पाच प्रवासी प्रवास करत होते. अपघातात अन्य चार जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून, वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या अपघाताबाबत कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg