loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यानजीक आसगे मांडवकरवाडीत दारुच्या नशेत विहीरीत पडून ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

लांजा (संजय साळवी) - दारूच्या नशेत विहिरीत पडल्याने एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आसगे मांडवकरवाडी येथे रविवारी २० सप्टेंबर रोजी रात्री घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची खबर योगेश गणेश दाभोळकर (३२ वर्षे, रा. आसगे, मांडवकरवाडी, ता. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गणेश लक्ष्मण दाभोळकर (५८ वर्षे, रा. आसगे मांडवकरवाडी ता. लांजा) यांना दारूचे व्यसन होते. यातूनच रविवार दि. २० सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास ते दारूच्या नशेत आसगे येथील विहिरीत पडले होते. त्यानंतर कुटुंबीयांच्या हि बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने लांजा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.

टाईम्स स्पेशल

मात्र ग्रामिण रुग्णालय लांजा येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड. कॉन्स्टे. उर्मिला शेडे या करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg