loader
Breaking News
Breaking News
Foto

नाट्यकर्मी संतोष सामंत- नेवाळकर यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) - आचरा वरचीवाडी येथील मूळ रहिवासी आणि बँक ऑफ इंडिया शाखा डोंबिवलीचे सेवानिवृत्त शाखाधिकारी संतोष उर्फ बाळ वसंत सामंत- नेवाळकर यांचे मुलुंड मुंबई येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाट्यकर्मी असणारे संतोष सामंत - नेवाळकर हे सहयोग प्रतिष्ठान डोंबिवलीचे कार्याध्यक्ष होते. शिवाय ते पर्यटन व्यावसायिकही होते. सामाजिक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. त्यांचा मित्रपरिवार दांडगा होता. आचरा येथील मालवणी बझार ची शाखा त्यांच्या निवासस्थानी भाडेतत्वावर सुरु आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg