चिपळूण : दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथे सहा दिवस भक्ती, श्रद्धा, उत्साह आणि आनंदाने न्हाऊन निघालेल्या गौरी-गणपती उत्सवाची आज पारंपरिक पद्धतीने भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. “गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषाने टेरवचा आसमंत दुमदुमून गेला. लाडक्या गणरायाला निरोप देताना बाळगोपाळांपासून महिला, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ आणि चाकरमान्यांच्या डोळ्यांत आनंदासोबतच बाप्पाच्या विरहाची हळवी भावना स्पष्टपणे जाणवत होती.
गणेश चतुर्थीपासून गेल्या सहा दिवसांपासून टेरव गावातील प्रत्येक वाडीतील घर भक्तीमय झाले होते. सकाळ-संध्याकाळ गणरायाची आरती, भजन, नैवेद्य, प्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. त्यात गौरी आगमनामुळे उत्सवाला पारंपरिक कोकणी संस्कृतीचा आणि माहेरवाशिणीच्या आपुलकीचा सुंदर स्पर्श लाभला. गणेशोत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी आणि आपल्या संस्कृतीशी पुन्हा एकदा जोडले जाण्याचा हक्काचा सण. मुंबई, पुणे, ठाणे, सुरत, बडोदा तसेच राज्याच्या विविध भागांत नोकरी- व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले टेरवचे चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल झाले होते. त्यामुळे गावातील घराघरांत नातेवाईकांच्या भेटीगाठी, हास्य-विनोद, आठवणी आणि आपुलकीने पुन्हा एकदा चैतन्य फुलले होते. शनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच विसर्जनाची लगबग सुरू झाली. घराघरांत गणरायाची विधिवत पूजा व आरती करून बाप्पाला निरोप देण्याची तयारी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, फुलांची उधळण आणि “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!” या जयघोषात गणरायाच्या विसर्जन मिरवणुका भक्तिभावाने मार्गस्थ झाल्या.बाळगोपाळांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, महिलांच्या भक्तिभावपूर्ण सहभागाने आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने विसर्जन सोहळ्याला विशेष भावनिक रंगत आली. ज्याच्या आगमनाने घराघरांत आनंदाचा उत्सव सुरू झाला, त्याच लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या.
विसर्जनापूर्वी गणरायाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर “गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!” असा एकच जयघोष करत भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. काही क्षणांसाठी वातावरणात उत्साह आणि विरह यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. सहा दिवसांचा हा आनंदोत्सव संपला असला, तरी बाप्पाच्या आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनात कायम राहणार आहेत. गणरायाला निरोप देताना “बाप्पा, पुढच्या वर्षी पुन्हा याच प्रेमाने, याच उत्साहाने आणि याच भक्तिभावाने आमच्या घरी या...” अशी मनोमन प्रार्थना प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणातून उमटत होती.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.