loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय ज्युदो व वेटलिफ्टिंग स्पर्धेत पालशेत विद्यालयाची दमदार कामगिरी

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - गुहागर तालुक्यातील पालशेत विद्यालयाने जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. ज्युदोमध्ये ६, तर वेटलिफ्टिंगमध्ये ३ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. नुकत्याच गुहागर येथे या स्पर्धा झाल्या. जिल्हास्तरीय ज्युदो व वेटलिफ्टिंग स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पालशेत येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विविध वजनी गटांत विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली असून अनेक खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ज्युदो स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात २५ किलो वजनी गटात अन्मेश डोर्लेकर याने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. ३० किलो वजनी गटात शौर्य पाटील याने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय निवड मिळवली, तर काव्य धातकर याने द्वितीय क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

३५ किलो वजनी गटात नक्ष बेदरकर याने द्वितीय क्रमांक मिळवला.१७ वर्षांखालील मुलांच्या गटात ४० किलो वजनी गटात वीर धातकर याने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. ४५ किलो वजनी गटात दक्ष पवार याने तृतीय क्रमांक पटकावला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात ४५ किलो वजनी गटात प्रतुष पालशेतकर याने तृतीय क्रमांक मिळवला. ५० किलो वजनी गटात भूषण नागे याने तृतीय क्रमांक, तर ५५ किलो वजनी गटात शुभम नागे याने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात ५२ किलो वजनी गटात सरोज विजय गावनंग हिने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात ४० किलो वजनी गटात श्रावणी जाधव हिने द्वितीय क्रमांक, तर ४४ किलो वजनी गटात तीर्थ पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवला.

टाईम्स स्पेशल

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनीही उल्लेखनीय कामगिरी केली. ७९ किलो वजनी गटात स्वारीत आगडे याने प्रथम क्रमांक, ४८ किलो वजनी गटात भूमी मांडवकर हिने द्वितीय क्रमांक, तर ५३ किलो वजनी गटात जान्हवी गुहागरकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वेटलिफ्टिंगसाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ज्युदो या क्रीडा प्रकारासाठी कोच समीर पवार यांनी खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. सर्व खेळाडूंना विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक बोलभट तसेच क्रीडा शिक्षक जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी खेळाडूंचे रयत शिक्षण संस्था, सातारा संचालक मंडळ सदस्य प्रशांत पालशेतकर, मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकवर्ग यांनी अभिनंदन करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालशेत विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, मेहनत, जिद्द, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg