loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात

सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकाराने तसेच सावंतवाडी विधानसभा भाजपा यांच्या वतीने अंध, अपंग व दिव्यांग बांधव-भगिनींना आधाराच्या काठ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून सामाजिक कार्यातून मिळणारे खरे समाधान अनुभवायला मिळाले. समाजातील गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “दिव्यांग बांधवांसाठी हे जनसंपर्क कार्यालय कायम खुले राहील. तुम्ही केव्हाही हाक द्या, तुमच्या अडचणीच्या काळात मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहीन.” या शब्दांतून त्यांनी दिव्यांग बांधवांना आधाराची ग्वाही दिली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, केतन आजगांवकर धिरेंद्र म्हापसेकर सिद्धार्थ भांबूरे, गोविंद साटेलकर बंटी जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी प्रसन्ना देसाई यांनी एक आठवण सांगताना नमूद केले की, विशाल परब यांच्या सुविद्य पत्नी यांनीदेखील यावर्षी आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा न करता दिव्यांग बांधवांसोबत साजरा केला. यातून परब परिवाराचा दिव्यांग बांधवांप्रती असलेला जिव्हाळा, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे कार्य असेच अविरत सुरू राहावे, हीच या उपक्रमामागची भावना आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg