loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणात सर्वत्र गौराईचे आगमन, सुहासिनींमध्ये उत्साहाचे वातावरण

रत्नागिरी (टाइम्स डिजीटल डेस्क) - कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरु असतानाच गुरुवारी गौराईचे घरोघरी आगमन झाले. सकाळपासूनच गौरीला आणण्यासाठी सुहासिनींची लगबग दिसून आली. नदीच्या काठावर तर काही ठिकाणी विहीरीच्या काठावर जावून गौराईला मोठ्या मानाने घरी आणण्यात आले. महिलांनी गौराईला पाण्याच्या ठिकाणी विनवणी केली. तिच्यासाठी गौराई गीते म्हणण्यात आली. फुगडी-झिम्मा खेळून गौराईला विनवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता घरी आगमन झाल्यानंतर तिची पूजा करुन एक दिवस गोडा व एक दिवस तिखटाचा नैवेद्य दाखविला जाणार आहे. काही ठिकाणी ती मुखवटे स्वरुपात सजते तर काही ठिकाणी पाच, सात, अकरा खड्याच्या स्वरुपात पूजली जाते. सुहासिनी मैत्रिणींसह नदी, ओढ्याकाठी एकत्र जमतात व तेथून विधीवत घरात घेवून येतात. घरी औक्षण करुन घरात आल्यावर गौरीला संपूर्ण घर दाखविले जाते व गणेशाच्या शेजारी तिची विधीवत प्राणप्रतिष्ठापना केली जाते.

टाईम्स स्पेशल

हा सोहळा सुहासिनींसाठी आठवणीत ठेवण्यासारखा सोहळा असतो. गौरी-गणपती सणासाठी सुहासिनी माहेरी आलेल्या असतात. दोन दिवस गणपतीसोबत गौरी पूजन होते. त्यातच सुहासिनी दंग होवून जातात. मनोहारी रांगोळ्याही अंगणात रेखाटल्या जातात. गौरी घरी आणताना घरात पावले रेखाटली जातात. बच्चे कंपनीही झांज वाजवते, घंटा वाजवते यात आनंद संचारतो. येत्या शनिवारी गणपती बाप्पासोबतच जेष्ठा गौरीचे विसर्जन होणार आहे. घरी गौराई आल्याने महिलावर्गात आता खूपच आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg