loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या अयान खानची तायक्वांदोच्या विभागीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी (जमीर खलफे) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी येथील उद्यमनगर परिसरातील फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी अयान मुश्ताक खान याने सुवर्णपदक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याची आगामी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, पंचायत समिती राजापूर, राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना आणि तायक्वांदो अकॅडमी राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुवर्णपदक विजेता अयान हा राम कररा आणि रेखा कररा यांच्या युवा तायक्वांदो अकॅडमीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून नियमितपणे प्रशिक्षण घेत आहे. या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम, आत्मसंरक्षण आणि शिस्तीचे धडे दिले जातात. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर नाताल, मुख्याध्यापिका सिस्टर सिल्विया आणि क्रीडाशिक्षक विनया मोरे, मुश्ताक खान, रुही खान यांनी अयानचे विशेष अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg