loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली नगरपंचायतीच्या पाणी प्रश्नावर तोडगा, शिवसेना नेते रामदास कदम यांची माहिती

खेड (दिलीप देवळेकर )- दापोली नगरपंचायतीमध्ये सोमवारी शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी बोलताना रामदास कदम यांनी सांगितले की, लोड कमी असल्यामुळे पाणी पुरवठ्याचे पंप उघडता येत नव्हते, त्यामुळे नागरिकांना ८-८ दिवस पाणी मिळत नव्हते. आता MSEB च्या अडचणी सोडवण्याचे काम सुरू आहे. योगेश दादांनी १०० KV चे २०० KV केले असून खूप चांगले काम केले आहे, फक्त २० टक्के काम बाकी आहे. पुढील ५ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि कुठलीही अडचण येणार नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाणी योजनेसंदर्भात दुसरी मोठी घोषणा लवकरच होणार असून दापोली नगरपंचायतीला शासनाकडून मोठा निधी मिळणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही ठिकाणी बेकायदेशीर जमिनींचे व्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. कूळ लावून जमीन हडप करण्याचे अनेक प्रकार सुरू आहेत."याची मी अतिशय गांभीर्याने चौकशी लावणार आहे, अनेक प्रकरणे मी बाहेर काढणार आहे," असा इशाराही त्यांनी दिला.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी देताना त्यांनी सांगितले की, काल योगेश दादांनी मुंबईला जाण्यासाठी २ ट्रेन मोफत सोडल्या असून गणेशभक्तांना त्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

टाइम्स स्पेशल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई- गोवा रस्त्यासंदर्भात लाज वाटते असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्यावर बोलताना रामदास कदम म्हणाले, "गडकरी साहेबांना संवेदना आहेत म्हणून ते बोलले, त्यांचा मला अभिमान वाटतो." माणगाव आणि इंदापूर रस्त्याच्या प्रश्नावरही लवकरच तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg