loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएचसी जामगे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, 'तिशीचा पल्ला' मोहिमेअंतर्गत शुगर, रक्तदाब तपासणी

जामगे (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र, जामगे येथे एनसीडी (असंसर्गजन्य आजार) तपासणी शिबिर घेण्यात आले. 'तिशीचा पल्ला तपासणी आणि सल्ला' या मोहिमेअंतर्गत या शिबिरात नागरिकांची शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच योगासत्र घेण्यात आले. यावेळी जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. असंसर्गजन्य आजारांची तपासणी करून किरकोळ आजारांवर उपचारही करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता भुवड, जेसीआय सदस्य शंकर पार्टे, आरोग्य निरीक्षक विकास जाधव व निलेश लाड, एलएचव्ही प्रतीक्षा जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी शुभांगी ओसवानी, आरोग्य सेविका शुभांगी कानाल, आरोग्य सेवक सतीश येवले, लॅब टेक्निशियन गीता, अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर अमित आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg