साटेली भेडशी (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील सुमारे ६० टक्के सामान्य जनतेचे जीवन शेतीशी जोडलेले आहे. हा शेतकरी देशाचा अन्नदाता म्हणून गौरविला जात असला, तरी त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन काम करणारे महत्त्वाचे खाते म्हणजे कृषी विभाग होय. मात्र, शासनाच्या नव्या आकृतीबंधामुळे याच कृषी विभागाचे पंख छाटून शेतकर्यांना अपंग करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी केला आहे. कृषी विभागामार्फत शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. वादळ, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ तसेच लहरी हवामानामुळे होणार्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादविणे, नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळवून देणे, पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविणे, अशी महत्त्वाची कामे कृषी विभाग करतो. त्यामुळे कृषी विभाग हा शेतकर्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.
महाराष्ट्राला प्रत्यक्ष शेताच्या बांधावर काम करण्यासाठी सुमारे ३८ ते ४० हजार कृषी सहाय्यकांची आवश्यकता असताना नव्या आकृतीबंधात केवळ २३,४७६ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापूर्वीच्या २८,५६६ पदांपैकी ७,७५८ पदे निरसित करण्यात आली, तर नव्याने २,६६८ पदे निर्माण करण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्षात सुमारे ५,०९० पदांची घट झाल्याचा दावा विलास सावंत यांनी केला. तीन-चार किलोमीटर चालत शेताच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करणारे, शेतकर्यांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कृषी सहाय्यक हे शेतकर्यांचे खरे देवदूत आहेत. अशा कर्मचार्यांची संख्या कमी करून कार्यालयात बसून कारकुनी करणार्या यंत्रणेवर अधिक भर देणे हे शेतकर्यांच्या हिताचे नाही, अशी टीका सावंत यांनी केली.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.