loader
Breaking News
Breaking News
Foto

तळेकांटे येथे डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात, एक जखमी

संगमेश्वर (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर तळेकांटे येथे वाहनचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट डिझायर कार महामार्गाच्या बाजूला खाली घसरून अपघात झाला. सोमवारी (१४ सप्टेंबर) रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात कारमधील प्रशांत बाबुराव खामकर (४२, रा. संभव टॉवर, पद्मावती नगर, विरार पश्चिम, मुंबई) यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, सुशील श्रीभगवान सिंग (६०, रा. संभव टॉवर, पद्मावती नगर, विरार पश्चिम, मुंबई) हे स्विफ्ट डिझायर (एमएच ४८ ए ५५१८) कार घेऊन विरारहून लांजाच्या दिशेने मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करीत होते. तळेकांटे येथे महामार्गावरील डायव्हर्जनचा अंदाज न आल्याने कारवरील त्यांचा ताबा सुटला. त्यानंतर कार महामार्गाच्या बाजूला खाली जाऊन अपघात झाला.

टाईम्स स्पेशल

अपघातानंतर प्रशांत खामकर यांना उपचारासाठी खासगी वाहनाने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातात कारचे नुकसान झाले असून, महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक मदत केंद्रचे पोलीस हवालदार रामपुरे, मस्कर आणि खोंदल यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कार्यवाही केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg