loader
Breaking News
Breaking News
Foto

पुढच्या वर्षी लवकर या....च्या जयघोषात सावंतवाडीत ५ दिवसांच्या बाप्पाला निरोप

सावंतवाडी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात आणि मांगल्यमय वातावरणात सावंतवाडी तालुक्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. गेले पाच दिवस मोठ्या उत्साहात बाप्पाची आराधना केल्यानंतर भक्तिभावाने गणरायाला निरोप दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी तालुक्यातील गावागावांत दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांच्या श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दीड दिवसांच्या गणपतीनंतर आता ५ दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गेले पाच दिवस पूजा, आरती आणि भजनाचा नाद परिसरात घूमत होता. सायंकाळपासून सुरू झालेले विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कृत्रिम तलावाची सोय देखील करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg