loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली-भेडशी येथील ई-पिकपाणी नोंदणी करताना शेतकर्‍यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यामुळे प्रक्रिया रखडली

दोडामार्ग, : साटेली-भेडशी येथील शेतकर्‍यांना सध्या ई-पिक नोंदणी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. डीसीएस अ‍ॅपवर साटेली-भेडशी गावाच्या सर्वे क्रमांकाची नोंद करताना नकाशावर साटेली-भेडशीऐवजी ‘सासोली’ गाव दाखविले जात असल्याने पुढील ई-पिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची तक्रार शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. ई-पिक नोंदणीसाठी डीसीएस अ‍ॅपवर साटेली-भेडशी येथील संबंधित सर्वे क्रमांक टाकल्यानंतर पुढील माहिती भरताना नकाशावर चुकीच्या पद्धतीने ‘सासोली’ गाव दिसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतजमिनीची योग्य नोंद करता येत नसून ई-पिक नोंदणीची प्रक्रिया रखडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ई-पिक नोंदणी ही विविध शासकीय योजना, कृषी अनुदान, पीकविमा तसेच शेतकर्‍यांना मिळणार्‍या विविध योजनांच्या लाभांसाठी महत्त्वाची असल्याने या तांत्रिक त्रुटीचा थेट परिणाम शेतकर्‍यांवर होण्याची शक्यता आहे. वेळेत नोंदणी न झाल्यास पात्र असूनही काही शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. या समस्येबाबत संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन डीसीएस अ‍ॅपवरील गावाच्या नकाशातील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करावी आणि साटेली-भेडशी गावाची योग्य नोंद उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

लोकप्रतिनिधी तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तांत्रिक अडचण दूर करावी आणि साटेली-भेडशीतील शेतकर्‍यांची ई-पिक नोंदणी सुरळीत करावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg