loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले तरीबंदर किनार्‍यावर आलेल्या रानडुक्कराच्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडले; वन विभागाची कौतुकास्पद कामगिरी

दापोली (प्रतिनिधी) : भाद्रपद मासातील वार्षिक गणेश चतुर्थी निमित्त आंजर्ले येथे घराघरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी ये-जा सुरू असतानाच अचानकपणे आंजर्ले येथील तरीबंदर समुद्र किनार्‍यावर एक रानडुक्कराचे पिल्लू समुद्र किनार्‍यावर आढळून आले. समुद्र किनार्‍यावर नेहमीप्रमाणे सायंकाळी भटकंती करिता गेलेल्यांच्या जवळ ते रानडुक्कराचे पिल्लू येऊ लागल्याने ते आपल्यावर हल्ला करेल की काय? या भितीने उपस्थित सर्वांचीच पळापळ सुरू झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील आंजर्ले या सुप्रसिद्ध गावातील तरीबंदर येथील येथे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सोमवारी सायंकाळी अचानकपणे एक रानडुक्कराचे पिल्लू समुद्रकिनार्‍यावर भटकू लागल्याने तेथे किनार्‍यावर उपस्थित असलेल्यांना ते पिल्लू आपल्यावर हल्ला करेल कि काय याची भिती वाटली. त्यामुळे ते त्या पिल्लापासुन दूर गेले. आणि त्यांनी प्राणिमित्रांना याची माहिती दिली. आज़र्ले ताडाचा कोंड येथे राहणारे प्रणित बाईत, वैभव बाईत आणि चिखलतळे येथे राहणारे प्रफुल्ल मिसाळ या प्राणी मित्रांनी तत्काळ आंजर्ले तरीबंदर येथे येऊन त्या रानडुक्कराच्या पिल्लाला सुरक्षित पकडले. प्राणीमित्रांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबवली.

टाईम्स स्पेशल

दापोली वनविभाग अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणिमित्रांनी आंजर्ले तरीबंदर समुद्र किनार्‍यावर आलेल्या रानडुक्कराच्या पिल्लाला पकडून त्याला काही मार वगैरे लागले आहे का? याची खात्री करून वन विभाग अधिकारी प्रभू सबाणे यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सदरच्या रानडुक्कराच्या पिल्लाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडले या कामी प्राणीमित्र प्रणित बाईत, वैभव बाईत, प्रफुल्ल मिसाळ तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि समाजसेवक राजेश जैन यांचेही मोठे सहकार्य लाभले. त्यामुळे अचानकपणे तरीबंदर येथे आलेल्या रानडुक्कराचे प्राण वाचले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg