loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया मध्ये मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. निलेश सांबरे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये कोकणातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत पुढे आले पाहिजेत, त्यांनी मोठ-मोठी पदे मिळवली पाहिजेत यासाठी जिजाऊ संस्था ही नेहमीच आपल्या पाठीशी राहील, असे आवाहन केले. कोकणामध्ये स्पर्धा परीक्षाकडे वळणारा विद्यार्थी वर्ग खूप कमी आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे परंतु विद्यार्थी मागे पडतात हे लक्षात घेऊन पाटपन्हाळे महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा गुहागर आणि चिपळूण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी शहरी भागात जाऊन स्पर्धा परीक्षा तयारी करू शकत नाही हे लक्षात घेऊन या स्पर्धा परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये कोकणातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व असले पाहिजे असे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेसाठी महाविद्यालयामध्ये सुसज्ज अशी लायब्ररी तयार केली आहे. यामध्ये वर्ग एक, वर्ग दोन, स्टाफ सिलेक्शन, पोलीस भरती या सर्व परीक्षा संदर्भात मार्गदर्शन नियमित पणे केले जाणार आहे. तसेच हे सर्व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत असणार आहे.

टाईम्स स्पेशल

महाविद्यालयातील विद्यार्थ्याबरोबरच गुहागर तालुक्यातील असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे, आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी ए देसाई यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश कोळवणकर, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत, प्रा. प्रसाद भागवत, प्रा. दिनेश पारखे, प्रा. जालिंदर जाधव, प्रा. त्रिशला साबळे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg