loader
Breaking News
Breaking News
Foto

वावेघर परिसरातील खांदेशी गल्ली येथे आढळला ३५ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह

रसायनी (आनंद पवार): रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी अवस्थेत आढळून आलेल्या मयत पुरुषाच्या वारसांचा शोध घेण्यासाठी रसायनी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास वावेघर परिसरातील खांदेशी गल्ली येथील धोंडाजी हॉटेलच्या बाजूला, ता. पनवेल,जि. रायगड येथे एक अनोळखी पुरुष मृतावस्थेत आढळून आला. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्र.३६/२०२६, बी.एन.एस.एस.कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मयत पुरुषाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून बांधा अतिशय सडपातळ/कुपोषित असून शरीराच्या बरगड्या स्पष्टपणे दिसत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याचा वर्ण काळा, केस काळे असून चेहऱ्यावर दाढी खुटलेली आहे. तसेच मानेवर लाल रंगाची आयकार्डची दोरी असून त्याने गडद राखाडी रंगाची हाफ पॅंट परिधान केलेली होती. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मयत पुरुषाच्या डाव्या पायाला (Sepsis) झालेल्या संसर्गामुळे मेटॅटिक शॉकमुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

या वर्णनावरून सदर व्यक्ती कोणाच्या परिचयाची असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत माहिती असल्यास त्यांनी रसायनी पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg