loader
Breaking News
Breaking News
Foto

आता सिम भाड्याने देणं पडेल महागात! 3 वर्षांचा तुरुंगवास, 50 लाखांच्या दंडाची तरतूद; DoT चा नवा नियम

नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने (DoT) मोबाइल यूजर्सना त्यांच्या नावावर जारी झालेली सिम कार्ड इतरांना वापरण्यासाठी देऊ नयेत, असा इशारा दिला आहे. बनावट सिम जारी करणे, दूरसंचार ओळखकर्त्यांचा गैरवापर आणि आयएमईआय (IMEI) क्रमांकात छेडछाड केल्यास गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात, असे विभागाने 21 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अलीकडील सायबर गुन्हे तपासात उघड झालेल्या एका प्रकरणानंतर ही सूचना जारी करण्यात आली. छत्तीसगडमधील एका पॉइंट ऑफ सेल (पीओएस) एजंटने नागरिकांच्या ओळखपत्रांचा वापर करून त्यांच्या संमतीशिवाय आणि माहितीशिवाय २५ मोबाइल कनेक्शन सुरू केल्याचा आरोप आहे.हे प्रकरण उघड झाल्यानंतर डीओटी आणि दूरसंचार सेवा पुरवठादारांनी त्या पीओएसला काळ्या यादीत टाकले. त्यामुळे तो पुढे सिम जारी करू शकत नाही. संबंधित २५ कनेक्शनची तपासणी डीओटीच्या डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मवर करण्यात आली. संशयास्पद आढळलेली कनेक्शन फेरपडताळणीसाठी पाठवण्यात आली. पडताळणीत अपयशी ठरलेले क्रमांक बंद करण्यात आले. आपल्या ओळखपत्रावर मोबाइल क्रमांक घेतला गेल्याचे ग्राहकाला नेहमीच माहीत असेलच असे नाही, हा धोका या घटनेतून समोर येतो.

टाइम्स स्पेशल

आयएमईआय (IMEI) म्हणजे इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी. हा मोबाइल उपकरणाशी निगडित ओळख क्रमांक असतो. अशा ओळखकर्त्यांचा गैरवापर किंवा त्यात छेडछाड केल्यास नागरिकांसाठी तसेच दूरसंचार जाळ्याच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होऊ शकतो, असे सरकारने म्हटले आहे. आपल्या नावावरील सिम कसे तपासावेत .: नागरिक सरकारच्या संचार साथी पोर्टलवर किंवा मोबाइल अ‍ॅपवर आपल्या नावावर जारी झालेले सर्व मोबाइल क्रमांक तपासू शकतात. या सुविधेतून नको असलेली किंवा अनोळखी कनेक्शन ओळखून ती बंद करण्याची विनंती करता येते.याच पोर्टलवरील 'चेक जेन्युइननेस ऑफ युअर मोबाइल हँडसेट' सुविधेतून हँडसेटचा आयएमईआय तपासता येतो. त्यातून फोनचा ब्रँड, मॉडेल आणि उत्पादकाची माहिती दिसू शकते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg