loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी येथे व्हीलचेअर क्रिकेट सिलेक्शन कॅम्पचे आयोजन

रत्नागिरी - दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी व व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन पुणे महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्हीलचेअर वापर करणाऱ्या व्यक्तींसाठी व्हीलचेअर क्रिकेट खेळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देत आहोत. रत्नागिरी जिल्हा व्हीलचेअर क्रिकेट संघाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेकरीता सहभागी होण्याकरीता लवकरच रत्नागिरी येथे व्हीलचेअर क्रिकेट सराव व सिलेक्शन कॅम्प आयोजित करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ज्या दिव्यांग व्यक्तींना मनापासून क्रिकेट खेळाची आवड आहे पण शारीरिक अडचणीमुळे क्रिकेट खेळणे शक्य होत नाही अशा दिव्यांग व्यक्तींनी या क्रिकेट सराव कॅम्प मध्ये सहभागी व्हावे, असे आव्हाहन दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे जिल्हाध्यक्ष, क्रीडा प्रशिक्षक प्रशांत सावंत यांनी केले आहे. या क्रिकेट कॅम्प मध्ये सहभागी होण्याकरता रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी या संदर्भात राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट खेळाडू जनार्दन पवार संपर्क क्रमांक 9967846441 या क्रमांकावर संपर्क करून आपण या क्रिकेट सराव कॅम्पमध्ये सहभागी होत असल्याची नाव नोंदणी करावी.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg