loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वधर्मसमभाव, पर्यावरण संवर्धन अन् आरोग्य शिबिर; मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचा गणेशोत्सवात नवा सामाजिक पॅटर्न!

पनवेल :- उत्सवाचा झगमगाट आणि देखाव्यांच्या पलीकडे जाऊन गणेशोत्सवातून सामाजिक परिवर्तनाचा विचार कसा रुजवावा, याचा नवा आदर्श मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने घालून दिला आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या दीड दिवसांच्या गणेशोत्सवात सर्वधर्मसमभाव, पर्यावरण संवर्धन आणि मोफत आरोग्य शिबिर असा अनोखा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला. या उपक्रमाची पाहणी करत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी बाप्पाचे दर्शन घेतले व डॉ. मुनीर तांबोळी यांच्या या बहुआयामी समाजोपयोगी उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या वतीने संस्थात्मक पातळीवर साजरा होणारा हा गणेशोत्सव सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ठरला असून यंदा या परंपरेचे आठवे वर्ष मोठ्या उत्साहात व एकोप्याने साजरे करण्यात आले. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून सलोखा निर्माण करणे आणि उत्सवाला समाजसेवेची जोड देणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. मुनीर तांबोळी यांनी यावेळी स्पष्ट केले. यंदाचा उत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. उत्सवाला आणि गणरायाच्या दर्शनासाठी येणार्‍या प्रत्येक पाहुण्याला शाल तसेच पवित्र तुळशीचे रोप भेट देऊन सन्मानित करण्यात आले. या माध्यमातून नागरिकांमध्ये ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि निसर्ग संरक्षणाचा प्रभावी संदेश पोहोचविण्यात आला. केवळ औपचारिकता न ठेवता पर्यावरण संवर्धनाची प्रत्यक्ष कृती या उपक्रमातून घडवून आणली गेली.

टाइम्स स्पेशल

दीड दिवसांच्या विधिवत पूजेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देताना फेडरेशनच्या महिला पदाधिकार्‍यांचा उत्साह विशेष वाखाणण्याजोगा होता. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर भव्य मिरवणूक काढत महिला वर्गाने गणरायाला भक्तिभावात निरोप दिला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर, राष्ट्रीय सचिव गुरदीप सिंह, महाराष्ट्र महिला अध्यक्ष रत्नप्रभा गोमासे, महाराष्ट्र सचिव निलेश भगत, विकास पाटील, मुद्दसिर पटेल, किरण अढागले, नेहा किरनली, मुग्धा लाटकर, पूनम नागटिळक, प्रतिम पाटील, मंगल भारवड, विपुल बाबरे आणि कार्यालयीन प्रमुख सूरज नागे आदी पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg