loader
Breaking News
Breaking News
Foto

ढोक्रवलीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड; पूजा मांडवकर यांचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीतर्फे सन्मान

मंडणगड (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायत ढोक्रवलीच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी पूजा मांडवकर यांची प्रथमच महिला अध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने एका महिलेला तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा सन्मान देत नेतृत्वाची संधी दिल्याने त्यांच्या निवडीचे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने स्वागत करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्षा पूजा मांडवकर यांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी तंटामुक्त समितीच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “गाव पातळीवरील तंटे व वाद गावातच सामोपचाराने मिटविणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा तसेच न्यायालयांवरील ताण कमी होण्यास मदत होते. गावातील शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा टिकविण्यासाठी तंटामुक्त समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पूजा मांडवकर यांची बिनविरोध निवड ही महिलांना नेतृत्वाची संधी देणारी सकारात्मक बाब आहे.”

टाईम्स स्पेशल

यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर, चिपळूण ग्रामीण तालुकाध्यक्ष उदय घाग, चिपळूण तालुका ग्रामीण महिला अध्यक्षा वैष्णवी राजे-शिर्के, बूथ अध्यक्ष गणपत राणीम, ग्रामपंचायत ढोक्रवलीच्या माजी सरपंच सलोनी गावकर, तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा पूजा मांडवकर, अंगणवाडी सेविका शितल राणीम, पूर्वी गावकर, बाळ घवाळे, दिनेश घवाळे, महेंद्र वामणे, योगेश राणीम, अशोक मोहिते, सोमा राणीम, विजय जोशी, कृष्णा मोहिते, प्रशांत राणीम, दीपक मोहिते, दक्षता मोहिते, किरण कुंडूगळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg