loader
Breaking News
Breaking News
Foto

काजरघाटी धार परिसरात पोलिसांचा छापा, '१ लाख ८० हजार रुपयांच्या २ किलो १०० ग्रॅम गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

​रत्नागिरी: रत्नागिरी शहरात अवैध अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता आपली पकड अधिक मजबूत केली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने सोमवारी संध्याकाळी काजरघाटी धार परिसरात धडक कारवाई करत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका संशयित तस्कराला रंगेहाथ अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर मुद्देमाल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला काजरघाटी धार परिसरात एका इसमाद्वारे गांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री किंवा वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या बातमीची तात्काळ शहानिशा करून पोलिसांनी या भागात संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. संशयित इसम त्या ठिकाणी येताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २ किलो १०० ग्रॅम अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी गांजासह तस्करीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला असून संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

​ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. उपअधीक्षक आरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी अत्यंत कौशल्याने आणि सतर्कतेने ही मोहीम फत्ते केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg