loader
Breaking News
Breaking News
Foto

लाडक्या बहिणींना खुशखबर ... ऑगस्ट महिन्याचा ₹1500 चा हप्ता 24 सप्टेंबरनंतर खात्यात जमा होईल

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार असून २४ सप्टेंबरनंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे.महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर पुढील रकमेची वाट पाहणाऱ्या राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरनंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे हा निधी टप्प्याटप्प्याने महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरुवातीला गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, लाभार्थी महिलांची आधार जोडणी, ई-केवायसी (e-KYC) पडताळणी आणि बँकिंग व्यवहारांशी संबंधित काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यास वेळ लागल्याने या वितरणाला थोडा विलंब झाला.सध्या प्रशासकीय स्तरावर निधी वितरणाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. ई-केवायसी आणि छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची संख्या सुमारे १ कोटी ६६ लाख झाली आहे. या सर्व पात्र भगिनींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रुपये थेट जमा केले जाणार आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg