loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील एकल महिलांची माहिती संकलित करण्यासाठीच्या सर्वेक्षणाला आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : महाराष्ट्र शासनाच्या चौथ्या महिला धोरणांतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच धर्तीवर लांजा नगरपंचायतीच्या वतीने शहरातील एकल महिलांची माहिती संकलित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणाला आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. समाजातील विधवा, परित्यक्ता व घटस्फोटित तसेच ३५ वर्षांवरील अविवाहित महिलांची माहिती या सर्वेक्षणाच्या माध्यमातून संकलित करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या महिलांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीची अचूक माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्यांना शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही करणे सुलभ होणार आहे. एकल महिलांना अनेकदा आर्थिक, सामाजिक तसेच कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांची अधिकृत नोंद उपलब्ध करून देणे आणि त्यांना शासकीय योजनांच्या प्रवाहात आणणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असून हे सर्वेक्षण केवळ लांजा नगरपंचायत हद्दीतील महिलांसाठी असून पात्र महिलांनी मुदतीपूर्वी नगरपंचायत कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

यापूर्वीची नोंदणीची मुदत ३० ऑगस्ट रोजी संपली होती, ती मुदत आता शुक्रवार १८ सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आल्याने अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र महिलांना पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लांजा शहरातील जास्तीतजास्त पात्र एकल महिलांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन लांजा नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg