संगमेश्वर - बावनदी येथे महामार्गावर झालेल्या अपघातात तेजस मेस्त्री या महाविद्यालयीन तरुणाचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे कुटुंबाने एकमेव आधार गमावला आहे. संपूर्ण परिसरात तीन दिवस झाले तरी शोककळा व्यक्त होत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच विघ्न आल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळी, शेजारचे लोक या कुटुंबाला दिलासा देत आहेत, पण दुःख आभाळाऐवढे मोठे आहे. श्रीगणेशच आता यातून या कुटुंबाला बाहेर पडण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना अनेक नागरिक करीत आहेत. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर बावनदी, संगमेश्वर येथे रविवारी, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास कारने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात मोटारसायकलस्वार तेजस विनायक मेस्त्री (वय २३, रा. वेळवंड, ता. रत्नागिरी) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव रघुनाथ रामबाडे (वय ४५, रा. पडवण, ता. लांजा) हे आपल्या ताब्यातील एन्जॉय कार (क्र. एमएच ०२ डीडब्ल्यू ०१९४) मधून मुंबईहून लांजाच्या दिशेने जात होते. बावनदी येथे त्यांच्या कारची मोटारसायकल (क्र. एमएच ०८ एबी ७९१४) वरील तेजस मेस्त्री यांना पाठीमागून जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की, मोटारसायकलच्या पाठीमागील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात तेजस मेस्त्री यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर महामार्गावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस हेड कॉन्स्टेबल बळीराम शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रामपुरे, बाबू खोंदल आणि सटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हलवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावोगावी तयारी सुरू आहे. तेजस मेस्त्री हा सुद्धा गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी करीत होता. दरम्यान बावनदी येथील गणेशभक्तांचा पाट देण्यासाठी सकाळी बाहेर पडला होता. पाट देऊन झाल्यानंतर तो गाडीमधील टायरची हवा चेक करण्यासाठी जावून गावी परतत होता. अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या घरात जात असताना त्याच्यावर काळाने झडप घातली आहे. मनमिळावू, परोपकारी तेजस अचानक गेल्याने वेळवंड गावात शोककळा पसरली आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.