loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडमध्ये नगरसेवक सुभाष सापटे यांचा रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

खेड (प्रतिनिधी) - मंडणगड नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक सुभाष सापटे यांनी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. त्यांच्या या प्रवेशामुळे मंडणगडच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळात भर पडल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच सुभाष सापटे यांनी चिपळूण येथे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना नगरसेवक सुभाष सापटे म्हणाले, "गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझे सहकारी मंडणगड तालुक्याच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करू. तसेच शिवसेनेची ताकद अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशप्रसंगी उद्योजक संदेश चिले, कल्पेश शिंदे, दिनेश कांबळे आणि प्रवीण दिवेकर हे देखील उपस्थित होते. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी नव्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत मंडणगडमध्ये शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. सुभाष सापटे यांच्या प्रवेशामुळे मंडणगड नगरपंचायत क्षेत्रात शिवसेनेला नवे बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg