दोडामार्ग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे येथील तेजस तुकाराम गावडे यांनी बांबू व नैसर्गिक साहित्याचा वापर करून श्री गणपती बाप्पासाठी आकर्षक आणि पर्यावरणपूरक सजावट साकारली आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे परिसरातून कौतुक होत आहे. तेजस गावडे यांनी आपल्या कल्पकतेतून बांबूच्या काठ्या, बांबूच्या पट्ट्या, नैसर्गिक गवत तसेच पारंपरिक वस्तूंचा वापर करून कोकणातील पारंपरिक घराची सुंदर प्रतिकृती साकारली आहे.
या सजावटीच्या मध्यभागी श्री गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान असून, संपूर्ण सजावटीला पारंपरिक आणि नैसर्गिक रूप देण्यात आले आहे. ही सजावट पूर्ण करण्यासाठी तेजस गावडे यांनी मागील काही दिवसांपासून आपला वेळ देत मेहनत घेतली. विशेष म्हणजे त्यांच्या या संकल्पनेला त्यांच्या कुटुंबीयांचीही मोलाची साथ लाभली. कुटुंबातील सदस्यांनी सजावटीच्या कामात सहकार्य करत तेजस यांच्या कल्पनेला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी हातभार लावला. महागड्या सजावटीच्या साहित्याला पर्याय म्हणून परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून साकारलेली ही सजावट पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ठरत आहे.
ग्रामीण भागातील तरुणांमध्ये असलेली कलात्मकता, कल्पकता आणि मेहनतीची जिद्द या उपक्रमातून दिसून येते. तेजस तुकाराम गावडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी साकारलेली ही पर्यावरणपूरक गणपती सजावट म्हणजे कला, कल्पकता, मेहनत आणि कुटुंबाच्या एकजुटीचा सुंदर संगम असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.