loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडात सोलर प्लेट चोरीचा प्रकार उघड! ब्राह्मणवाडीत संशयास्पद इसम जेरबंद

खेड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील पालवणी - ब्राह्मणवाडी येथील आंबा-पोफळीच्या बागेत संशयास्पद हालचाली करणार्‍या एका इसमाकडून पोलिसांनी दोन जुन्या सोलर प्लेट जप्त केल्या आहेत. संशयित आरोपीचे नाव रमाकांत द्वारिका राजभर (वय ४५, मूळ रा. डडवराजा, डडवा भैय्या, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. पालवणी, ब्राह्मणवाडी, ता. मंडणगड) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांच्या सुमारास मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विशाल विठोबा कोळथरकर हे पालवणी ब्राह्मणवाडीतील बागेत गस्तीवर असताना आरोपी संशयास्पद स्थितीत आढळला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याच्या ताब्यात २ हजार ६०० रुपये किमतीच्या दोन जुन्या सोलर प्लेट, वायर व कनेक्टर मिळून आले. सदर माल कुठे व कोणाकडून आणला याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी मंडणगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मंडणगडमध्ये वाढत्या सोलर चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg