loader
Breaking News
Breaking News
Foto

आ. निलेश राणेंची जाणीवपूर्वक बदनामी करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा; प्रितम गावडेंचे पोलिसांना निवेदन

मालवण, (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील श्रावण गवळीवाडी येथे अज्ञातांनी लावलेल्या बॅनरचा विपर्यास करून आमदार निलेश राणे यांची सोशल मीडियावर जाणीवपूर्वक बदनामी करणार्‍या संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन वजा तक्रार युवासेना कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रितम गावडे यांनी मालवण पोलिसांत दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, श्रावण गवळीवाडी येथे बॅनर लावण्यात आला. यात गावातील आश्वासने पूर्ण न झाल्याने तसेच प्रलंबित कामे पूर्ण न झाल्याने यापुढे कोणत्याही पुढार्‍याने किंवा राजकारणी यांनी गावात मत मागण्यासाठी येऊ नये, अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला. या बॅनरवर आमदार निलेश राणे किंवा शिवसेना पक्षाचा कोणताही उल्लेख नव्हता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, या बॅनरचा विपर्यास करून बॅनर एडिट करून सोशल मीडियावर आमदार निलेश राणे यांची बदनामी केली जात असल्याचे पुरावे व तक्रार प्रितम गावडे यांनी पोलिसांकडे सादर केली आहे. तक्रारीत काही व्हॉट्सप ग्रुप तसेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून बॅनर एडिट करून प्रसारित केल्याचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. यात कुडाळ लाईव्ह ग्रुपवर गोट्या चव्हाण व बाळा पावसकर तसेच इंस्टाग्रामवर अमर घाडी नामक व्यक्तीकडून आमदार निलेश राणे यांच्या नावे बॅनर एडिट करून बदनामी केली जात आहे. तर संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी. या आशयाचे निवेदन वजा तक्रार युवासेना कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रितम गावडे यांनी मालवण पोलिसांत दिली आहे.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणात संबंधित सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून सातत्याने बदनामीकारक मजकूर प्रसारित केला जात असल्याचे तक्रारीत नमूद करून संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रितम गावडे यांनी पोलिसांकडे केली आहे. यावेळी कुडाळ-मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील गावडे, युवासेना तालुकासचिव तथागत मालवणकर, विहार कोदे, रोहन आचरेकर, निकीत वराडकर, ओमकार चव्हाण आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg