loader
Breaking News
Breaking News
Foto

विलवडे रेल्वे स्थानकावरील विविध मागण्यांसाठीचे लाक्षणिक उपोषण तूर्तास स्थगित

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - विलवडे रेल्वे स्थानकावर विविध मागण्यांसाठी २० सप्टेंबर रोजी करण्यात आलेले उपोषण रेल्वे प्रवाशी, संघटनेचे पदाधिकारी, शिष्टमंडळ यांना संबंधित अधिकारी यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. विलवडे रेल्वे प्रवासी संघटना, मुंबई ग्रामीण संघर्ष समितीच्या पदाधिकारी व शिष्टमंडळाच्या वतीने जादा गाड्या थांबविण्यात याव्या, दुसरा प्लॅटफॉर्म बांधावा, प्रतिक्षा गृह अद्ययावत करणे, रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावणे इत्यादी विविध मागण्यासाठी विलवडे रेल्वेस्टेशन येथे २० सप्टेबर रोजी उपोषण पार पडले. संबधित रेल्वे अधिकारी यांनी मागण्यांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिले. केंद्रीय मंत्रालयात जादा गाड्या सोडण्याची शिफारस करण्याचे आश्वासन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असून न्याय मिळेपर्यंत नियोजित आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केला असल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. या लाक्षणिक उपोषणाला विलवडे रेल्वे प्रवासी संघटना, मुंबई ग्रामीणचे अध्यक्ष अमोल रेडीज, उपाध्यक्ष भास्कर खामकर, संतोष चव्हाण, दीपक जानकर, सल्लागार सुभाष लाड, जगदीश जी. राजापकर, प्रकाश तोरस्कर तसेच सदस्य तुषार पालकर, युवराज हांडे, विश्वनाथ गुरव, रवींद्र जानकर आणि दीपक तोरस्कर डॉ.एस.व्ही.कदम आदीसह प्रवाशी जनता मोठ्या संख्येत उपस्थित होती. उपोषणाला चांगला प्रतिसाद लाभला. लांजा तहसीलदार, पोलीस अधिकारी यांनी उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्ते यांना योग्य ते सहकार्य केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg