loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत रेमजे परिवाराने साकारलाय लाडघर येथील श्री दत्त मंदिराचा देखावा

दापोली (प्रतिनिधी) - दापोली शहरातील वडाचा कोंड येथील रेमजे परिवाराकडून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. गेल्या १५० वर्षांपेक्षा अधिक वर्षे सुरू असलेली अखंडित गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही त्याच आनंदी आणि उत्साहाच्या भावनेने अखंडपणे सुरू आहे हे रेमजे परिवाराचे खरे तर विशेष आहे. दापोली शहरातील वडाचा कोंड येथील रेमजे परिवार हा एकुणच कुटुंबाच्या संख्येने मोठा असलेला परिवार आहे. तरी त्यांचे गौरी गणपती सणाच्या उत्सवातील एकत्रितपणाचे सख्य हे आजही कायम असेच आहे. अशा या रेमजे परिवाराकडून अगदी दरवर्षीच विविध प्रकारचे समाज परिवर्तनाच्या प्रबोधनाचे सामाजिक देखावे श्रींच्या सजावटीत साकारले जातात. तर कधी देव दर्शन घडववणा-या देखाव्यांची देखील प्रतिकृती साकारल्या जातात अशा या देव दर्शनामध्ये याआधी आसुद येथील सुप्रसिध्द केशवराज मंदिर, तर कधी पन्हाळेकाजी येथील सुप्रसिद्ध लेण्यांचा देखावा साकारून प्राचीन पुरातन संस्कृतीचा अनोखा नजारा सर्व गणेशभक्तगणांना पाहण्यासाठी दापोली शहरातच उपलब्ध करून दिला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तर यावर्षी दापोली तालुक्यातील लाडघर येथील श्री दत्त मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडघर येथे ज्यांना खास जाता येत नाही. त्यांच्यासाठी दापोली वडाच्या कोंडात रेमजे परिवाराने खास सोय उपलब्ध करून दिली आहे. खरं तर रेमजे परिवातील अमित रेमजे हे उत्कृष्ट कलाकार आहेत. आजवर त्यांनी विविध सामाजिक समस्या, विविध ठिकाणच्या रंगावली प्रर्दशनात रांगोळीव्दारे रेखाटून अगदी राज्यस्तरावर कलाप्रेमींची दाद मिळवली आहे. याच अमित रेमजे यांच्यासह विजय, पंकज, सिध्देश, रुपेश रेमजे अमित, प्रदीप, दीपक बाल कलाकार अवनी, दिव्या रेमजे परिवारातील सदस्यांच्या मेहनतीने नाव ठेवायला जागा नाही, अशी अगदी हुबेहूब लाडघर येथील श्री दत्त मंदिर देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी केवळ दापोली तालुक्यातीलच नव्हे तर रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, खेड, मंडणगड, चिपळूण, गुहागर तालुक्यातील कलाप्रेमींची रिघ लागली आहे. लाडघर येथील श्रीदत्त मंदीराचा साकारण्यात आलेला देखावा पाहिल्यानंतर त्यांना मिळणारी शाबासकिच्या कौतुकीची दाद हीच त्यांच्या कलेची खरी पोच पावती आहे.

टाईम्स स्पेशल

दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनार्‍याजवळील जुन्या, पवित्र, श्रद्धा, निसर्ग आणि इतिहासाचं संगमस्थान असलेले लाडघर येथील श्रीदत्त मंदिराची रचना आणि बांधकामाच्या अगदी साध पारंपरिक कोकणी शैलीतील आहे. मात्र अथांग समुद्र आणि दाट झाडांनी वेढलेल्या टेकडीच्या कुशीतील सौंदर्य मनाला मोहवून टाकणार आहे. अशा या मंदिराची स्थापना १८८० ते १८९० च्या दरम्यान झालेली आहे. लाडघर गावातील पांडुरंग संभाजी मोरे या दत्त भक्ताला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्यानुसार गावाच्या उत्तरेकडील टेकडीवर अंदुबराच्या झाडाखाली पवित्र दत्त पादुका सापडल्या. त्या पादुकांची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली आणि पुढे इथे मंदिर उभारण्यात आलं. मंदिराच्या मागच्या बाजूने पायर्‍या उतरल्या की तुम्ही पोहोचता समुद्राच्या किनार्‍यावर अशा या लाडघरला ब्ल्यू प्लॅग मानांकन मिळाले असल्याने या लाडघरचं नाव आता जागतिक नकाशावर झळकत आहे. अशा लाडघर येथील श्री दत्त मंदिराचा रेमजे परिवाराने देखावा साकारत खरं तर फार मोठे काम केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg