loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाची अंमली पदार्थ विक्रेते व नशेखोर यांचेविरोधात धडक कारवाई , अमली नशेखोर दिसला कि लगेच पोलिसांना कळवा

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, बाळगणे व सेवन करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई सुरु असून जिल्हा पोलिस अधिक्षक रत्नागिरी नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधिक्षक बी.बी. महामुन यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलिस दलाने मिशन फिनिक्स अंतर्गत ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत विशेष मोहिम राबवून १६ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत २२ आरोपींना अटक केली असून २,०२,२०० किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांची अवैध विक्री व तस्करी करणार्‍या तसेच त्याचे सेवक करणार्‍यावर यापुढेही कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार आहे. अंमली पदार्थांच्या विखळ्यातून युवक व समाजाला दूर करण्यासाठी मिशन फिनिक्स अंतर्गत प्रतिबंधात्मक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक व सेवन याबाबत कोणतीही माहिती नागरिकांना प्राप्त झाल्यास त्यांनी तत्काळ आपल्या जवळच्या पोलिस ठाणे येथे कळवावी, अथवा रत्नागिरी पोलिस दलाच्या ‘रत्नसेतू चॅटबॉट-९३७१४१५६१२’द्वारे माहिती द्यावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg