loader
Breaking News
Breaking News
Foto

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श! लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांनी केले घरच्या घरी गणपती विसर्जन

केळंबे-लाजा (सिराज नेवरेकर) - गणेशोत्सवाचा आनंद लुटतानाच पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही, याची काळजी घेत लांजा येथील प्रसिद्ध उद्योजक शिवाजी कोत्रे यांनी आपल्या घरगुती गणपतीचे पर्यावरणपूरक पद्धतीने घरच्या घरी विसर्जन केले. सार्वजनिक जलाशयांचे प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगांमुळे नद्या, विहिरी आणि समुद्राचे पाणी दूषित होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, उद्योजक शिवाजी कोत्रे यांनी पर्यावरणाचा संदेश देत एका मोठ्या पाण्याच्या बॅलरमध्ये अत्यंत साधेपणाने आणि भक्तीभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला. घरीच विसर्जन करून निसर्गाचे रक्षण केले. बाप्पाची भक्ती करताना आपण ज्या निसर्गात राहतो, त्याचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. सार्वजनिक जलस्रोतांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही घरातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला, अशी भावना उद्योजक शिवाजी कोत्रे यांनी यावेळी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

कोत्रे कुटुंबीयांच्या सहा दिवसाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवामुळे परिसरातील इतर नागरिकांनाही एक नवी प्रेरणा मिळाली असून, आगामी काळात अशा पद्धतीने विसर्जन करणार्‍यांची संख्या वाढेल, असा विश्वास स्थानिकातून व्यक्त केला जात आहे. याप्रसंगी अमेय कोत्रे, अक्षय कोत्रे परिवारातील सदस्य आणि काही हितचिंतक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg