loader
Breaking News
Breaking News
Foto

यंदाच्या गणेश चतुर्थी सणाचे प्रमुख आकर्षण ठरले ते बोडदे गावातील बाबल्या बायग्याची गोष्ट, गणेशोत्सव गाजवला!

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील काही गावात शासकीय गावरान जमीन ही परराज्यातील बलाढय उद्योजक खाणधारकांना देऊन येथील पर्यावरण, तसेच जैवविविधता नष्ट करून गावचे सौंदर्य बेचिराख करायला निघाले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील पाच गावातून या प्रकल्पाला विरोध झाला. या प्रकल्पामुळे गावात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण बोडदे गावात गणेश चतुर्थी निमित्ताने प्रशांत गवस याने वेगळी संकल्पना मांडली आहे. या गणेश चतुर्थीचे विषेश आकर्षण केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यात सध्या गाजत असलेल्या स्टोन क्रशर, मायनिंग आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्र याविषयावर प्रबोधन करण्याचं कामं या गोष्टीच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रशांत ज्ञानेश्वर गवस यांच्या निवासस्थानी केलेल्या देखाव्यात शाश्वत विकास की विनाशकारी विकास यांवर भाविकांना विचार करायला लावणारी सजावट केली आहे. सोबत दाखविलेला व्हिडीओ भक्तांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. बाप्पा आपल्या कोकणात दरवर्षी येतो, त्यामुळे या भूमीचं पर्यावरण तसंच राखलं जावं हीच बाप्पांची खरी ईच्छा आहे. जास्तीत जास्त लोकांनी येऊन गणेश दर्शनाचा तसेच प्रबोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गवस परिवाराने केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg