loader
Breaking News
Breaking News
Foto

साहिल चव्हाण मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोकण प्रदेश युवा अध्यक्षपदी - डॉ चंद्रकांत मोजाड

खेड (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष अभिजित दरेकर, राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सुचनेनुसार मराठा क्रांती स्वराज्य संघटना मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक व विकासक डॉ चंद्रकांत तुळशीराम मोजाड यांनी ही निवड जाहीर केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी बोलताना मुंबई येथील उद्योजक व प्रख्यात विकासक डॉ चंद्रकांत तुळशीराम मोजाड यांनी सांगितले, तारुण्यात साहिलचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. वर्षातुन दोन वेळा रक्तदान शिबिरे, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन शिबिरे घेऊन फायद्याची शेती कशी करावी, या बाबत अमूल्य माहिती देण्यात येत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. दापोली येथे साहिल कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असे नाव कमावले असून साहिल संतोष चव्हाण हे ३५ ते ४० भुकेल्या गरजवंताना रोज नियमित अन्नदान करत असतात. साहिल एक सुविद्य, परोपकारी उमदे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे. राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा आरती बबनराव दळवी, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे, जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार, रायगड जिल्हा अध्यक्ष विलासराव चाळके, प्रदेश सह सचिव अजय पडवळ, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अस्मिता आत्माराम साळुंखे, खेड तालुका अध्यक्ष श्रीराम कदम, पनवेल तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुजर, रोहा तालुका अध्यक्ष समीर मोरे, खालापूर तालुका अध्यक्ष दिनेश रमेश महाडीक, सल्लागार ॲड सचिन चाळके, खोपोली शहर अध्यक्ष निलेश विचारे, यांच्यासह शेकडो समाजबांधव, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन करत शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg