loader
Breaking News
Breaking News
Foto

साहिल संतोष चव्हाण यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कोकण प्रदेश युवा अध्यक्षपदी निवड

दापोली : प्रतिनिधी : मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कोकण प्रदेश युवा अध्यक्षपदी साहिल संतोष चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष तथा उद्योजक व विकासक डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड यांनी ही निवड जाहीर केली. मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस तथा बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय मीडिया अभिजीत दरेकर, तसेच राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड यांनी सांगितले की, तरुण वयात साहिल चव्हाण यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. वर्षातून दोन वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिरे घेऊन फायदेशीर शेती कशी करावी, याबाबत उपयुक्त माहिती देण्याचे कार्य ते करीत आहेत. या उपक्रमांना नागरिक व शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.दापोली परिसरात साहिल कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधकाम क्षेत्रात आपले वेगळे नाव निर्माण केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत साहिल संतोष चव्हाण हे दररोज सुमारे ३५ ते ४० गरजू व भुकेल्या व्यक्तींना अन्नदान करीत असल्याचेही डॉ. मोजाड यांनी सांगितले. सामाजिक कार्याची आवड, परोपकारी वृत्ती आणि उमदे व्यक्तिमत्त्व यामुळे साहिल चव्हाण यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

टाइम्स स्पेशल

साहिल संतोष चव्हाण यांच्या कोकण प्रदेश युवा अध्यक्षपदी निवडीची घोषणा होताच संघटनेच्या देशभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यावेळी राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे, जिल्हाध्यक्ष कृष्णा शेलार, रायगड जिल्हाध्यक्ष विलासराव चाळके, प्रदेश सहसचिव अजय पडवळ, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सौ. अस्मिता आत्माराम साळुंखे, खेड तालुका अध्यक्ष श्रीराम कदम, पनवेल तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुजर, रोहा तालुका अध्यक्ष समीर मोरे, खालापूर तालुका अध्यक्ष दिनेश रमेश महाडीक, सल्लागार ॲड. सचिन चाळके, खोपोली शहर अध्यक्ष निलेश विचारे यांच्यासह शेकडो समाजबांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साहिल चव्हाण यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg