रत्नागिरी, : गणेशोत्सवाच्या सणासाठी लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त लाखो चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या उत्साहाने आपल्या मूळ गावाकडे परतत आहेत. मात्र, कोकणात पाऊल ठेवताच गावी परतणार्या चाकरमान्यांच्या या आनंदावर सीएनजी तुटवड्यामुळे मोठे विरजण पडत आहे. महामार्गावरील बहुतांश पंपांवर गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना तासनतास लांबच लांब रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. इंथन तुटवड्यामुळे ऐन सणाच्या काळात प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी परिसरातील बहुतांश पेट्रोल व सीएनजी पंपांवर सध्या ’सीएनजी संपला आहे’ असे फलक पाहायला मिळत आहेत. ज्या मोजक्या ठिकाणी गॅस उपलब्ध आहे, तेथे वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही अखेर इंधन मिळत नसल्याने चाकरमानी आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरवर्षी गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणासुदीच्या काळात उद्भवणार्या या तांत्रिक अथवा कृत्रिम तुटवड्यामुळे केवळ बाहेरून येणारे प्रवासीच नव्हे, तर स्थानिक नागरिक आणि रिक्षा व्यावसायिकही मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
गणेशोत्सवाचे हे दिवस कोकणातील स्थानिक रिक्षाचालकांसाठी हक्काच्या कमाईचा काळ मानला जातो. मात्र, ऐन मोसमातच गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक रिक्षाचालकांना आपल्या गाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने आणि संबंधित कंपनीने यावर तत्काळ तोडगा काढून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.