loader
Breaking News
Breaking News
Foto

लोवलेचे माजी शिवसेना शाखाप्रमुख भगवान कदम यांचे निधन

संगमेश्वर (प्रतिनिधी) - लोवले खालचे वठार येथील रहिवासी, माजी शिवसेना शाखाप्रमुख, लोवले ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच तरुण मित्र मंडळ, लोवलेचे अध्यक्ष भगवान महादेव कदम (वय ७५) यांचे दुःखद निधन झाले. भगवान कदम हे मनमिळावू, शांत आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने लोवले परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक क्षेत्रात एक आपुलकीचे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg