loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे येथे नसरे परिवाराने बांबू आणि गवतापासून साकारली पर्यावरणपूरक सजावट

संगमेश्वर (प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यंदा संगमेश्वर तालुक्यातील देवळे वाणेवाडी येथील नसरे परिवाराने गणेशोत्सवात एक अत्यंत आगळीवेगळी आणि लक्षवेधी सजावट साकारली आहे. प्लास्टिक किंवा थर्मोकोलचा अजिबात वापर न करता केवळ बांबू, गवत आणि कागद यांसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून त्यांनी ही सजावट केली असून, त्यातून शेतकरी आणि निसर्गाचे अतूट नाते प्रभावीपणे मांडले आहे. अत्यंत सुबक आणि बारकाईने केलेल्या या कामातून निसर्गाशी जुळलेले ग्रामीण जीवन आणि शेतकर्‍यांचे महत्त्व अधोरेखित होते. विशेष म्हणजे, नसरे परिवाराची श्री गणेशाची मूर्तीदेखील पूर्णपणे शाडूच्या मातीची असून, ती पूर्णतः पर्यावरणस्नेही आहे. निसर्गाचे रक्षण करणे आणि आपल्या बळीराजाच्या कष्टमय जीवनाचा सन्मान करणे हाच खरा उत्सव आहे, असा संदेश या सजावटीच्या माध्यमातून देवळे गावातील नसरे परिवाराने दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg