loader
Breaking News
Breaking News
Foto

चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत दोडामार्ग इंग्लिश स्कूलची यशोगाथा सादर

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित उपक्रमात शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग या प्रशालेच्या शैक्षणिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशोगाथा सादर करण्यात आली. सुभाष चौगुले, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्तालय, पुणे तथा सिंधुदुर्ग जिल्हा नोडल अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागातील विविध पर्यवेक्षीय यंत्रणेच्या उपस्थितीत ही यशोगाथा सादर करण्यात आली. जिल्ह्यातील निवडक तीन शाळांना आपल्या शाळेतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम व शैक्षणिक वाटचाल सादर करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये दोडामार्ग इंग्लिश स्कूलचा समावेश असल्याने प्रशालेसाठी हा विशेष अभिमानाचा क्षण ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशालेच्या वतीने राज्य पुरस्कारप्राप्त आयडॉल टीचर आनंदा लक्ष्मण बामणीकर यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय, क्रीडा व कौशल्याधारित उपक्रमांची माहिती प्रभावीपणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे कृतियुक्त शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विज्ञान व तंत्रज्ञानाधारित उपक्रम, क्रीडा प्रशिक्षण, NCC, व्यावसायिक शिक्षण, पालक सहभाग, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय यशाची माहिती यावेळी मांडण्यात आली. प्रशालेच्या या उपक्रमशील वाटचालीचे आणि सादरीकरणाचे शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाळा करीत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे विद्यमान अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने प्रशालेची वाटचाल सातत्याने प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन मानदंड निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांकडून आनंदा बामणीकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg