loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड पोलिसांची मोठी कारवाई; विक्रीसाठी बाळगलेला 1 लाख 35 हजारांचा गांजा जप्त

खेड (प्रतिनिधी) : खेड-दापोली रस्त्यावर फुरूस येथे विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका तरुणाला खेड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एकूण 3 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.41 वाजताच्या सुमारास मौजे फुरूस येथे खेड-दापोली रस्त्याच्या कडेला संशयित आरोपी सकलेन असलम अंतुले (22, रा. भोस्ते जलालशहा मोहल्ला, ता. खेड) हा संशयास्पद स्थितीत आढळला. त्याच्या ताब्यात विक्रीसाठी बाळगलेला 320 ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा आढळून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी त्याच्याकडून 1,35,000 रुपये किमतीचा गांजा, 1,50,000 रुपये किमतीची सुजुकी अ‍ॅक्सेस 125 स्कुटी आणि 50 रुपये रोख रक्कम असा एकूण 3,06,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोशि सोहेल इक्बाल खान यांच्या फिर्यादीवरून अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम 20(ब)(2)(ब) अन्वये गु.र.नं. 351/2026 नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg