loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी, आतगाव परिसरात गणरायाचे वाजत गाजत आगमन

केळशी (मंगेश पाटील) - दापोली तालुक्यातील केळशी, आतगाव परिसरात गणरायाचे सोमवार दि. 14/09/2026 रोजी वाजत गाजत आगमन झाले आहे. भाविकांनी मोठया भक्तीभावाने गणरायाला घरी आणले गेले. यावेळी सर्वांच्या आनंदाला मोठे उधाण आले हॊते. सोमवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून यानिमित्त मुंबई पुणेसह विविध ठिकाणी नोकरी निमित्त असणारे चाकरमाणी केळशी, आतगांव परिसरात दाखल झाले आहेत. त्यामुळे बंद असणाऱ्या घरांची कुलपे उघडली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदा वाढते प्रवासी लक्षात घेता एसटी महामंडळाने विशेष जादा गाड्यांचे नियोजन न केल्याने चाकरमान्यांना खाजगी वाहनाने अधिकचे पैसे मोजून प्रवास करावा लागला आहे. बुधवारी मोठ्या भक्ती भावाने ग्रामस्थांनी बाप्पाला आपल्या घरी विराजमान केले असून बाप्पाची षडपोचार पूजा करून बाप्पाची आरती गाऊन वातावरण प्रसन्न झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त भाविक, चाकरमानी मोठया संख्येने गावी आल्याकारणाने गावातील बाजारपेठ फुलून गेली आहे.

टाईम्स स्पेशल

बाजारपेठेत खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. वाहनांची गर्दी तसेच भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांनी रस्ते काबीज केले आहेत. घराघरात गणरायाचे आगमन झाले असून भजनी मंडळी बाप्पाचे गुणगान गाण्यासाठी सज्ज झाले आहेत. या परिसरात दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस, व अकरा दिवसापर्यंत गणेशोत्सव साजरा होतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg