loader
Breaking News
Breaking News
Foto

‘कवितांचे गाव’ हा उपक्रम मंगेश पाडगावकरांच्या साहित्यिक वारशाला पुढच्या पिढीशी जोडणारा सांस्कृतिक उपक्रम :- ना. उदय सामंत

वेंगुर्ला - ‘कवितांचे गाव’ हा केवळ पर्यटनाचा प्रकल्प राहू नये. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यिक वारशाला पुढच्या पिढीशी जोडणारा सांस्कृतिक उपक्रम म्हणून विकसित व्हावा, अशी अपेक्षा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातल्या उभादांडा इथं साकारत असलेल्या ‘कवितांचे गाव’ प्रकल्पाला भेटी दरम्यान व्यक्त केली. संपूर्ण राज्यात ‘कवितांचे गाव’ उपक्रमा संदर्भात प्रमाणित कार्यपद्धती (Standard Operating Procedure – SoP) तयार करण्याच्या सूचना यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी संबंधितांना दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कवितेची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्यांचे साहित्य-संस्कृतीशी नाते अधिक दृढ व्हावे, हा ‘कवितांचे गाव ’ या प्रकल्पामागील उद्देश आहे. या प्रकल्पाला अधिक व्यापक स्वरूप देताना कवी मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यिक योगदानाचे जतन आणि संवर्धन करण्यावरही भर देण्याच्या सूचना यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली. पहिल्या टप्प्यात वाघेश्वर वाडी (गणेश मंदिराजवळ), सागरेश्वर, पूर्ण प्राथमिक जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2, सुखटनवाडी, प्राथमिक जिल्हा परिषद शाळा, बागायत वाडी आणि एमटीडीसी सागरेश्वर या पाच ठिकाणची कामे मराठी भाषा विभागामार्फत पूर्ण करण्याचे निर्देश, यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी दिले.

टाईम्स स्पेशल

यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी या कामांसाठी गटविकास अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले असून ही कामे येत्या 2 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देत सध्या सुरू असलेल्या दालनाचे काम अधिक चांगल्या पद्धतीने आणि दर्जेदार स्वरूपात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg