दापोली (चंद्रशेखर जोशी) : आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून दापोली तालुक्यातील कर्दे ग्रामपंचायतीच्या वतीने १९ सप्टेंबर २०२६ रोजी कर्दे समुद्रकिनारी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. समुद्रकिनारा स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासोबतच सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाला स्थानिक ग्रामस्थ, मुंबईकर ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानात समुद्रकिनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कागद, थर्माकोल तसेच विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तू गोळा करून किनारा स्वच्छ करण्यात आला. ग्रामस्थांनी श्रमदानातून स्वच्छता करताना समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य आणि नैसर्गिक परिसंस्था जपण्याचा संदेश दिला. या स्वच्छता अभियानासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली समुद्रकिनारा स्वच्छता मशीन विशेष उपयुक्त ठरली. मशीनच्या सहाय्याने वाळूत साचलेला कचरा आणि घाण हटविण्याचे काम करण्यात आले.
ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी मनुज जिंदाल तसेच गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांचे कर्दे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानण्यात आले. स्वच्छता अभियानाचे उद्घाटन कर्दे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सागडे, ग्रामसेवक भोरजे, माजी सरपंच सचिन तोडणकर, पंचायत समिती स्वच्छता विभागाच्या कर्मचारी पूजा देवकर तसेच कर्दे ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून स्थानिक नागरिक, पर्यटक आणि व्यावसायिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. समुद्रकिनाऱ्यावर फेकण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर प्लास्टिक वस्तू समुद्रात वाहून गेल्यास त्याचा थेट परिणाम सागरी जीवसृष्टीवर होतो. कासव, मासे, पक्षी तसेच इतर सागरी जीवांकडून प्लास्टिकचे तुकडे अन्न समजून गिळले जाण्याचा धोका असतो. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर कचरा न टाकणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे आणि कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर येताना स्वतःचा कचरा परत घेऊन जाणे किंवा उपलब्ध कचरापेटीत टाकणे, ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे, प्लास्टिकच्या बाटल्या व पिशव्या समुद्रात किंवा वाळूत न टाकणे, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील नैसर्गिक अधिवासाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माजी सरपंच सचिन तोडणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याची मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता वर्षभर सातत्याने सुरू राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कर्दे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता सप्ताह राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले. या अभियानामुळे कर्दे समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश नागरिक आणि पर्यटकांपर्यंत पोहोचला. ‘स्वच्छ समुद्रकिनारा, सुरक्षित सागरी पर्यावरण आणि निरोगी भवितव्य’ या उद्देशाने ग्रामस्थांनी एकत्र येत केलेले श्रमदान कौतुकास्पद ठरले.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.