loader
Breaking News
Breaking News
Foto

अतुल रावराणे यांनी देवगड तालुक्यातील विविध गणेश भक्तांच्या निवासस्थानी भेट देत घेतले श्री गणपती बाप्पाचे दर्शन

देवगड (प्रतिनिधी) - कोकणात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची लगबग पाहायला मिळत आहे. यामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळीही मागे नसून गणेश भक्तांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले जात आहे. भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी देवगड तालुक्यातील विविध गणेश भक्तांच्या निवासस्थानी भेट देत श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी देवगड येथील उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी उद्योजक नंदकुमार घाटे यांनी भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल राव राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीमुळे भक्तिमय वातावरणात आपुलकीचा संवादही साधला गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg