मालवण (प्रतिनिधी) - "गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर" या असा जयघोष करत आज मालवणात सहा दिवसांच्या गौरी- गणपतीचे विसर्जन करण्यात आले. बेंजोच्या तालावर वाजत गाजत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन मिरवणूक काढत गणेशभक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. गणेश चतुर्थी दिवशी मालवणात घराघरात गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी गौरींचेही आगमन झाले होते. काल सर्वत्र प्रथा परंपरा जोपासत गौरीचे विधिवत पूजन झाले. यानिमित्त घरोघरी फुगड्या, ओव्या तसेच पारंपारिक नृत्ये सादर करत महिलांनी गौरी पूजनात रंगत आणली. यामध्ये मोठ्या संख्येने माहेरवाशीणी सहभागी झाल्या होत्या. तसेच आरत्या आणि सुस्वर भजनानी सारे वातावरण भक्तिमय व चैतन्यमयी झाले होते.
गौरी पूजन तसेच गणपतीची मनोभावे सेवा केल्यावर आज शनिवारी सहाव्या दिवशी सायंकाळी मालवणात ठिकठिकाणी गौरी- गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अनेक गणेश भक्तांनी एकत्रित विसर्जन मिरवणूका काढल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. काही ठिकाणी पारंपारिक वाद्ये तर काही ठिकाणी बँजोच्या तालावर गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मालवण बंदर जेटी, चिवला बीच, दांडी, देऊळवाडा यासह विविध ठिकाणची विसर्जन स्थळे गणेश भक्तांनी फुलून गेली होती. भक्तिमय वातावरणात श्री गणरायाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी केली. गणेश विसर्जनानिमित्त मालवणात पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.