loader
Breaking News
Breaking News
Foto

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; गवस गुरुजी प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन

तिलारी (प्रतिनिधी) - गवस गुरुजी प्रतिष्ठान, उसप यांच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, रोख पारितोषिक व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून गवस गुरुजी प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी सरपंच प्रकाश गवस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाला कॅप्टन वासु नाईक, विठ्ठल रेडकर, शशिकांत गवस, डॉ. व्ही. जी. नाईक, प्रकाश रेडकर, उपसरपंच दाजी नाईक, भगवान रेडकर, विष्णू रेडकर, सुभाष धुरी, सौ. शुभांगी परब, तुकाराम धुरी, प्रशांत नाईक, अरुण गवस, दशरथ बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg