loader
Breaking News
Breaking News
Foto

पेट्रोल पंपावर UPI थांबणार? मुंबईतील पेट्रोल पंप चालकांचा इशारा; 15 ऑक्टोबरची डेडलाइन

मुंबई. पेट्रोल पंपावर UPI पेमेंट करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या UPI व्यवहारांवर लागू होणाऱ्या Merchant Discount Rate (MDR) च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने पेट्रोल पंपांना या शुल्कातून पूर्णपणे वगळले नाही, तर 15 ऑक्टोबर 2026 पासून पेट्रोल पंपांवर UPI पेमेंट स्वीकारणे बंद करण्याचा इशारा मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नव्या नियमानुसार 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या Person-to-Merchant (P2M) UPI व्यवहारांवर MDR लागू होणार आहे. या शुल्काचा थेट भुर्दंड ग्राहकांना देण्यात येणार नसून, व्यवहार स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे.पेट्रोल पंप चालकांचे म्हणणे आहे की, इंधन विक्रीवरील त्यांचा डीलर मार्जिन निश्चित स्वरूपाचे असते. त्यामुळे डिजिटल पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागल्यास त्यांच्या नफ्यावर थेट परिणाम होईल. ग्राहकांकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतीपेक्षा अतिरिक्त रक्कम घेण्याची त्यांना मुभा नसल्याने हा खर्च पंप चालकांनाच सहन करावा लागू शकतो.

टाइम्स स्पेशल

या पार्श्वभूमीवर पेट्रोल डीलर्स एसोसिएशन ऑफ मुंबईने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाला पत्र पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीला या MDR मधून पूर्णपणे वगळण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य झाली नाही, तर UPI सुविधा बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg