loader
Breaking News
Breaking News
Foto

कोयना धरण परिसरात मध्यरात्री 12 ते पहाटे ४ या वेळेत भूकंपाचे ५ सौम्य धक्के

कोयनानगर ( प्रतिनिधी ): महाराष्ट्राचे वरदान असलेल्या कोयना धरण परिसरात मध्यरात्री 12 ते पहाटे चार या वेळेच्या सुमारास भूकंपाचे ५ सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता दोन ते दोन पॉईंट पाच रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे तीव्रता कमी असल्याने धक्के सर्वसामान्य नागरिकांना जाणवले नाही, दरम्यान कोयना नगरचे भूकंपमापन केंद्र बंद असल्याने कोयना धरणापासून भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर जमिनीतील खोली आणि अक्षांश रेखांश याची नोंद होऊ शकली नाही.कोयना धरणाचा परिसर भूकंपप्रवण क्षेत्रात येतो ,धरणाच्या निर्मितीपासून आतापर्यंत या परिसराला लहान मोठे भूकंपाचे लाखो धक्के बसले आहेत त्यातील बहुतांश टक्के जाणवलेले देखील नाही. तीन पेक्षा जास्त रिश्टर स्केल तेवढे धक्के जाणवतात एका अर्थाने कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिका सुरू असते मात्र धरणाला आजपर्यंत कसलाही धोका निर्माण झालेला नाही. याबाबतची माहिती वहिनीच्या भूकंपमापन केंद्रातील अधिकारी किरण कानुगडे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोयना धरण परिसरात मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पहिला संमेल धक्का बसला रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.1 एवढी होती त्यानंतर एका तासाने दीड वाजता 2.3 क्षमतेचा दुसरा धक्का बसला त्यानंतर सव्वातीनला 2.2 आणि पंधरा मिनिटांनी 2.5 आणि पहाटे चार वाजता २.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा पाचवा भूकंपाचा धक्का बसला.

टाइम्स स्पेशल

कोयनानगर परिसरातील नागरिकांना मध्यरात्री पाऊस असल्याने धक्के जाणवले नाही तरीही काही नागरिकांनी भूकंप सारखा आवाज आला असे म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg